Thane : डम्पिंगला रोखायचे असेल तर कायदेशीर संघर्ष करावाच लागेल!  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Thane : डम्पिंगला रोखायचे असेल तर कायदेशीर संघर्ष करावाच लागेल!

प्रदीप भणगे

दिवा : ठाणे महापालिकेतील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेतली आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदुषणाची समस्या असताना ठाणे महानगरपालिकेचा कचरा जबरदस्तीने आमच्या गावांच्या माथी मारू नये, अन्यथा आंदोलन करू, रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हे देखील पहा :

डम्पिंगला विरोध करण्यासाठी १४ गावातील ग्रामस्थ जागोजागी बैठका घेत आहेत. गावागावात ठाणे महापालिका, आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्ष नेते यांच्या निषेधाचे बॅनर लावले आहेत. दरम्यान, काल शनिवारी संध्याकाळी भंडार्ली गावात बैठक पार पडली. या बैठकीला ठाणे  जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की डम्पिंगला जर रोखायचे असेल तर कायदेशीर संघर्ष, आंदोलन आणि रास्ता रोको करावाच लागेल असे सांगितले.

डम्पिंगला आमचा विरोध आहेच आणि जर डम्पिंग आलेच, तर कचऱ्याच्या गाड्या रोखून धरू असे ग्रामस्थ विजय पाटील यांनी सांगितले. डम्पिंग विरोध करण्यासाठी आंदोलन सुद्धा करू असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर येनदालकर, विजय पाटील, नामदेव पाटील, गुरुनाथ पाटील, समाजसेविका चित्रा बाविस्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

SCROLL FOR NEXT