Thane Breaking News : माझ्याकडे काेणी लक्ष नाही. माझी समस्या साेडविण्यासाठी मी अनेक वेळा गेलाे पण मला न्याय मिळाला नाही म्हणून मी आज हे पाऊल उचलले केले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंगल्यासमाेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणा-या युवकानं सांगितले. दरम्यान या घटनेनंतर पाेलिसांनी संबंधित युवकास ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)
ठाण्यातील नितीन सिग्नल नजीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्यासमोर एकाने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. युवकाचे हे कृत्य पाहताच पाेलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला हा प्रकार करु नये काय अडचण आहे असे विचारले.
दरम्यान संबंधित युवक (youth) हा रिक्षा चालक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्या एका प्रश्नासंदर्भात त्याला न्याय मिळत नसल्याने त्याने टाेकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
रिक्षा परवाना रद्द केल्याने पांडे निराश
दरम्यान पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा काेपरी पाचपाखाडी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्याचे नाव विनय पांडे असे असून ताे रिक्षाचालवताे.
त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने आरटीओने त्याचा रिक्षा परवाना रद्द केल्याची प्राथमिक माहिती उलब्ध झाली आहे. परवाना रद्द झाल्याने ताे हताश झाला हाेता. त्यामुळे त्याने टाेकाचं पाऊल उचचलं. या घटनेचा तपास वागळे पोलीस करत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.