Thane Traffic News saam tv
मुंबई/पुणे

Thane News : ठाणे-भिवंडी अंजूरफाटा मार्गावर 2 दिवस वाहतूक बंदी, पर्यायी मार्ग कोणते? कसा कराल प्रवास?

Thane Traffic News : ठाणे ते भिवंडी मेट्रो गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे-भिवंडी अंजूरफाटा मार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद राहणार आहे. त्याशिवाय वसई-दिवा रेल्वे वाहतूक देखील बंद असणार आहे.

Yash Shirke

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प पाच अंतर्गत सुरु असलेल्या ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील काम बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील अंजूरफाटा येथील वसई-दिवा रेल्वे मार्गावरील पुलाच्यावरुन मेट्रो लाईनचे गर्डर टाकले जाणार आहेत. या कामानिमित्ताने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

वसई-दिवा रेल्वेच्या मार्गावरील पुलावर मेट्रो लाईनचे गर्डर टाकले जातील. या कामामुळे १ आणि २ एप्रिल रोजी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ठाणे-भिवंडी मार्गावर अंजुर फाटाच्या पुढे भिवंडीत येण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंदी असल्याची माहिती नारपोली वाहतूक विभागाने दिली आहे. यादरम्यान वसई-दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील बंद असणार आहे.

सर्व वाहतूक रात्री बंद असल्याने पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने सुचवले आहेत. त्यानुसार -

१. मानकोली अंजूरफाटा खारबाव मार्गे अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घोडबंदर रोड मार्गे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असणार आहे.

२. नवी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना गैमन जंक्शन कळवा येथे प्रवेश बंदी असून गैमन जंक्शन कळवा येथून खारेगाव टोल नाकावरून घोडबंदर रोड मार्गे गुजरातकडे वाहने जातील.

३. माजीवडा, मानकोली मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना माजीवाडा वाय जंक्शन येथे प्रवेश बंदी असून पर्याय म्हणून माजीवाडा वाय जंक्शन येथून घोडबंदर रोड ने गुजरात कडे जाण्यासाठी पर्याय सुचवला आहे.

४. गुजरातकडून चिंचोटी नाका मार्गे अंजुर फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंदी असून त्यांच्यासाठी चिंचोटी नाका,गायमुख फाउंटन हॉटेल मार्गे घोडबंदर रोडने माजीवाडा जंक्शन ने पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Maharashtra News Live Update: खामगावात FDAची मोठी कारवाई; साडेतीन कोटींचे संशयास्पद सोयाबीन तेल जप्त

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

SCROLL FOR NEXT