ठाकरे-पवारांनी काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही- सोमय्या SaamTV
मुंबई/पुणे

ठाकरे-पवारांनी काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही- सोमय्या

राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचे काम ठाकरे पवार यांनी केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संतोष शाळीग्राम

मुंबई : राज्यातील यंदाचं अधिवेशन एका विषयाने फार गाजलं तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपद. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात त्यावरुन आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. सराकारची मागणी होती की मतदान हे आवाजी पद्धतीने व्हावे परंतु विरोधी पक्षाने त्याला विरोध केला. गुप्त पद्धतीने मतदान घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यावरचं आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आली आहे. पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) "आवाजी मतदानाचे" नाटक केले का? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे. महाविकास आघाडी कडे 175 आमदार यांच्या समोर भाजप कडे 105 आमदार असताना गुप्त मतदानात काँग्रेसचा स्पीकर सहज निवडून आला असता. राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचे काम ठाकरे पवार यांनी केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान राज्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल यांच्या पत्राच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळाला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते म्हणून सरकाराने अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली नाही अशी बातमी साम टीव्हीने दिली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत भाषेत पत्र लिहून मी घटनाबाह्य काम करणार असे सांगितले. आवाजी मतदान हे घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी पत्राद्वारे म्हणले. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Accident News : जालन्यात अपघाताचा थरार, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

Summer Sharbat Recipe : नारळ पाणीला टक्कर; उन्हाळ्यात प्या 'या' फळाचे थंडगार सरबत, वाचा सोपी रेसिपी

Weekly Horoscope: या राशींना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT