Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena Podcast Sanjay Raut: 'शिवसेना तोडणं म्हणजे...'; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Vishal Gangurde

गिरीश कांबळे

Sanjay raut News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बहुचर्चित आवाज कुणाचा पॉडकास्ट प्रसिद्ध झाला आहे. ६.१ भागाच्या पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.'शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Latest marathi News)

आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये ठाकरे गटाचे नेते, अभिनेते आदेश बांदेकर यांनी खासदार संजय राऊत यांना विविध प्रश्न केले. या प्रश्नांवर उत्तर देताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या शिवाय महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात महत्वाच्या घडामोडी यापुढे घडणार नाहीत. हे सगळ्यांना माहिती आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना 'इंडिया'मध्ये मानाचं स्थान आहे'.

'आमची पॉवर आहे, लोकांमध्ये प्रतिष्ठा आहे. सत्ताधाऱ्यांना आमच्याविषयी भीती आहे. यालाच पॉवर म्हणतात. ही विरोधकांना ही भीती उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे, असे राऊत म्हणाले.

भाजवर टीका करताना राऊत म्हणाले, 'भाजपने शिवसेनेवर जो घाव घातला आहे, हा घाव महाराष्ट्रावर आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. शिवसेना महाराष्ट्राची प्रोटेक्टर आहे'.

'दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी शिवसेना फोडून महाराष्ट्रावर घाव घातला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आधी आपली कवच कुंडलं मजबूत केली पाहिजेत. आधी महाराष्ट्रात मग देशात फिरायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले, 'मी जर पक्षासाठी हानिकारक होतो तर बाळासाहेबांनी पक्षात ठेवलं नसतं. स्वार्थासाठी ज्याला जायचं असतं, तो कोणावरही खापर फोडून जातो. आम्हाला मोह नव्हता'.

'कोणत्याही प्रकारच्या कारवाया झाल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. काही आमच्या सारखे खंबीर हृदयाचे नसतील. काही उंदराच्या हृदयाचे असतात. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं, अशा शब्दात शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT