Ravindra Waikar Join Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Ravindra Waikar Join Shinde Group: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Ravindra Waikar Join Shinde Group:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले की, ''गेली ५० वर्ष मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेल आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळ आमदार हे पर्यायाने आले. ज्यावेळी मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळ आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''कोविडमध्ये कामे झाली नाहीत. पण आता आरेतील रस्त्यासाठी पैसे पाहिजेत. लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी रडतायत. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय सोडवाता येत नाहीत. लोक आपल्याला निवडून देतात. आपण काम केलं पाहिजे.'' (Latest Marathi News)

वायकर म्हणाले, ''देशात भाजपची सत्ता असून पंतप्रधान मोदी चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. सर्व विकासकामांची प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलोय. नाही सोडवले तर, मग मी लोकांना उत्तर देऊ शकणार नाही. यासाठीच मी इथे आलो आहे.''

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''वायकरांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. गेले अनेक वर्ष शिवसेनेचे काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली केलं. अनेक वर्षे काम करत आलो. आज संपूर्ण परिवार त्यांचा इकडे उपस्थित आहे. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो.

ते म्हणाले, ''त्यांनी (वायकर यांनी) आपल्या मतदार संघातील प्रश्न मला सांगितले. देशात विकासाच पर्व सुरु आहे. विकास कामाचा परिणाम वायकरांवर झाला आहे. मतदाताना न्याय देणे अपेक्षित असतं. नागरिकांचे प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. वायकरांना आता विश्वास निर्माण झाला आहे आणि म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT