sanjay raut saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Politics: कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे लक्ष, 15 दिवसात दुसऱ्यांदा संजय राऊत डोंबिवलीत

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येतेय.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Dombivli Politics:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येतेय. पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीचा दौरा केला होता. त्यापाठोपाठ डोंबिवलीतील तीन शाखांचे उद्घाटन व जाहीर सभेसाठी खासदार संजय राऊत 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा डोंबिवलीत येणार आहेत.

त्यामुळे ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतय. संजय राऊत जाहीर सभेत कुणाचा कसा समाचार घेतात, कार्यकर्त्यांना काय काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंबिवली ठाकरे गटाच्या तीन शाखांचे उद्घाटन येथे तीन फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शहर प्रमुख विवेक खामकर यांनी दिली. तसेच या उद्घाटनानंतर डोंबिवली पश्चिम येथे संजय राऊत यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार, हे मात्र निश्चित आहे.  (Latest Marathi News)

डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर, जुनी डोंबिवली आणि कोपर येथे तीन शाखा नव्याने सुरू होत असल्याची माहिती डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी दिली दिली. याच दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून आयोजित कलारंग महोत्सवात सहभागी झालेल्या आणि बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार व बक्षीस समारंभ खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर डोंबिवली पश्चिमेकडील मैदानात खासदार संजय राऊत जाहीर सभा घेणार आहेत . काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शाखांना भेटी दिल्या होत्या. या निमित्ताने ठाकरे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं होतं.

यावेळी खासदार संजय राऊत देखील त्यांच्यासोबत होते. पंधरा दिवसानंतर पुन्हा संजय राऊत तीन शाखांचे उद्घाटन, जाहीर सभेसाठी डोंबिवलीत येणार असल्याने पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सभेत संजय राऊत नेमकं कोणावर निशाणा साधतात, कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याची उत्सुकता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

SCROLL FOR NEXT