THACKERAY BROTHERS TIRANGA VICTORY RALLY AT SHIVAJI PARK DRAWS MASSIVE YOUTH SUPPORT saam tv
मुंबई/पुणे

ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष, शिवाजी पार्क परिसरात विजयी सभा, Gen Zच्या पाठीशी ठाकरे बंधू

Uddhav and Raj Thackeray Share Stage Again: दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेत. शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या तिरंगा विजयी जल्लोषानं एक वेगळाच धुरळा उडवून दिलाय. या सभेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आगामी काळात राजकारणात काही बदल होणार का? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...

Suprim Maskar

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विजयी जल्लोषात मोठ्या संख्येनं तरुण तिरंगा घेऊन सहभागी झाले. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत तरुणांनी आणलेल्या उपहासात्मक पोस्टर्सनी सर्वांचंच लक्ष वेधलं. अनोख्या पद्धतीनं बॅनरबाजी करत तरुणांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. एव्हंढच नाहीतर ठाकरे बंधु सभेसाठी स्टेजवर गेले असताना शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मात्र शिवतीर्थावरुनच आपली उपस्थिती दर्शवली. त्यांनी सभेसाठी जमलेल्या तरुणांचा गॅलरीमधून हात दाखवून उत्साह वाढवला. दरम्यान, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजप विरुद्ध भारत संघर्ष सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीये... तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला..

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे दुसऱ्यांदा एकत्र आले. उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरत तर राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पाठिंबा दिला होता. खरंतर, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंनी मोर्च्याची हाकही दिली होती. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारनं प्रधानांचा राजीनामा घेतल्यानं ठाकरे बंधूंना मोर्चा मागे घ्यावा लागला.

मात्र, असं असलं तरी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंच्या पुढच्या भूमिकेला ठाकरेंनी आधीच पाठिंबा दिलाय. ठाकरे बंधूंच्या आजच्या तिरंगा विजय जल्लोषात हजारोंच्या संख्येनं तरुणांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे आगामी काळातही ठाकरे नावाची क्रेझ जेन झीमध्ये कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

मुंबई हादरली! भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग|VIDEO

भारताच्या 'गोल्डन क्वीन'ची हॅटट्रिक! मीराबाई चानूनं मिळवलं सलग तिसरं सुवर्ण पदक; कॉमनवेल्थ बनवला नवा विक्रम

BE पदवी, खासगी अनुभव... तरीही महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याची नोकरी; कारण काय?

अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांची बस उलटली; अधिवेशन आटोपून परतताना घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT