Uddhav and Raj Thackeray to reunite on July 5 in Mumbai, celebrating their victory over Hindi imposition in Maharashtra. 
मुंबई/पुणे

अखेर ठरलं! ठाकरे बंधू एकत्र येणार, शनिवारी मुंबईत आवाज घुमणार!

Raj and Uddhav Thackeray :राज आणि उद्धव ठाकरे ५ जुलै रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत. हिंदी सक्ती रद्द केल्याचा विजय साजरा करण्यासाठी ही मोठी सभा होणार आहे. दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.

Namdeo Kumbhar

Thackeray brothers united : अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण ठाकरे बंधूंची युती झाली नाही, तर हिंदी सक्ती विरोधात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी दोघेही एकत्र येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदेनंतर याबाबत संकेत मिळाले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू विजयी जल्लोष साजरा करणार आहेत, त्याची तयारी सुरू झाली आहे. ठाकरेंकडून तसे संकेत देण्यात आले आहेत.

हिंदी सक्तीवरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेत दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे. दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे दोघांच्या युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, त्रिभाषा शिक्षणाचं स्वरुप स्वीकारल्यानंतर त्याच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंधूनी आक्रमक होत रान पेटवले होते.

राज ठाकरे काय म्हणाले ?

मराठी भाषेबाबत तडजोड होता कामा नये, सरकारने पुन्हा अशी चूक करायला नको, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. सरकारमधील अनेकांचा हिंदी सक्तीला विरोध होता. ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये याबाबत आणखी काही बोलणार आहे. मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका.
राज ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT