सचिन जाधव
Crime in Pune: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमास नकार दिल्यामुळे एकाने अल्पवयीन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
संपूर्ण प्रकरण काय?
प्रेमास नकार दिल्यामुळे एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू करून तिचे छायाचित्र प्रसारित केले. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने चाकूचा धाक दाखवत मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Police) एका तरुणाला अटक केली आहे.
अदनान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने १६ वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने त्याच्या प्रेमास नकार दिला. त्यामुळे तरुणाने रागाच्या भरात मुलीचे बनावट इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले. (Pune Crime News)
त्यानंतर त्याने त्या मुलीचे छायाचित्र त्यावर प्रसारित केले. तसेच, तिला चाकूचा धाक दाखवून दोन दिवसांत माझ्यासमवेत न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मुलीने फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील टॉप्स पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.