Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: रस्त्यावर उभ्या जेसीबीला टेम्पोची धडक; टेम्पो चालक जखमी, कल्याण मधील घटना

रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी कल्याण फडके मैदान परिसरात घडली आहे.

Shivani Tichkule

अभिजित देशमुख

Kalyan News Today: रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी कल्याण फडके मैदान परिसरात घडली आहे. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

कल्याण (Kalyan) पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानासमोरील सुभाष नगर येथे आज सकाळी झाडाची भलीमोठी फांदी तुटून रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता बंद होता. ही फांदी जेसीबीमार्फत बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान ही भलीमोठी फांदी जेसीबी (JCB) आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बाजूला केली जात असताना एक टेम्पो त्याच मार्गावरून लालचौकीकडे भरधाव येत होता.

जेसीबीचालक आणि त्या शेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आतच या टेम्पोने जेसीबीला धडक दिली. या अपघातात जेसीबीचा मागचा पंजा पुढची काच तोडून टेम्पो थेट केबिनमध्ये घुसला. ज्यामध्ये हा टेम्पो चालक त्यात अडकून पडला. सुदैवाने टेम्पो चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT