Pune Swargate Bus Deopt Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर

26-Year-Old Survivor Gets Financial Help: स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय पीडित तरुणीला राज्य सरकारच्या 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

२५ फेब्रुवारीला स्वारगेट बस डेपोत तरूणीवर २ वेळा अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. २६ वर्षीय पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच पीडित तरूणीला प्रदान केली जाणार असल्याची माहिती आहे.

स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित तरूणीला तीन लाख रूपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित तरूणीला मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी ही मदत दिली जाणार असून, त्यासाठी यापूर्वी शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे.

याच शिफारशीनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पीडित महिलांना मानसिक आधार देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी मनोधैर्य योजना राबवली जाते. याच योजनेखाली पीडितेला राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम पीडित तरूणीला प्रदान केली जाणार आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत २५ फेब्रुवारीला एका २६ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी दत्ता गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT