Sachin Waze News Saam Tv news
मुंबई/पुणे

Sachin Vaze News: मोठी बातमी! खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर

Sachin Vaze News:निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एका खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

Vishal Gangurde

Sachin Vaze News

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एका खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. बिमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून सचिन वाझे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सत्र न्यायालयात सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. परंतु जामीन मंजूर झाल्यानंतरही वाझेंना तुरुंगातच राहावे लागणार आहे. (Latest Marathi News)

व्यापारी विमल अग्रवाल यांनी कोव्हिड काळात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुंड रियाज भाटी, सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांच्या खंडणीचा आरोप केला होता.

व्यापारी विमल अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर सचिन वाझे , सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली होती . मात्र, या प्रकरणात परमबीर सिंग, रियाझ भाटी यांना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, याच प्रकरणात सचिन वाझे यांना 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील दोन प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. एका प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. तर अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना दोन प्रकरणात जामीन मिळाला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात वाझे यांना जामीन

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मनी लाँड्रिग प्रकरणात जामीन मंजूर झालेला आहे. त्यांनी सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. वाझेंनी अर्ज दाखल केल्यानंतर ईडीने विरोध दर्शविला होता. त्यानंतर १८ नोंव्हेंबर २०२२ रोजी त्यांना जामीन मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT