suspend irrigation department executive engineer demands mla ram shinde Saam TV
मुंबई/पुणे

Ram Shinde News : सरकारची दिशाभूल करणा-या कार्यकरी अभियंत्यास निलंबित करा : आमदार राम शिंदे

दरम्यान कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही आमदार राम शिंदे यांनी दिला आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

शासनाबद्दल जनतेत राेष निर्माण व्हावा या हेतुने कार्यकरी अभियंता यांचे कामकाज दिसून येत आहे. शेतक-यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असताना देखील अभियंता याने धरणातून पाणी साेडले नाही. त्यामुळे त्यांची चाैकशी करुन निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (mla ram shinde) यांनी केली आहे. यावेळी आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली होती. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ऊन कडक पडू लागल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

या विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी पाणी सोडण्याबाबत टाळाटाळ करत सरकारची दिशाभूल केली. अनेक नियमांचे उल्लंघन केले धरणामध्ये पाणी असून सुद्धा पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारा नुकसान झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनाविरोधात रोष व्यक्त होईल असे कृत्य केल्यामुळे या कार्यकरी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली. दरम्यान कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही आमदार राम शिंदे यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना आक्रमक,तडजोडीला नकार – अरविंद मोरे

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

SCROLL FOR NEXT