Pune News Saam
मुंबई/पुणे

Pune Crime: वॉशरूमला गेली अन् आचाऱ्यानं डाव साधला, १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पुण्यात खळबळ

Minor Girl Physically assaulted: आचारी म्हणून काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कॅटरसमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र, बेपत्ता होताच तीन दिवसानंतर तिची ओढणी आणि चप्पल सापडली. पीडितेने आत्महत्या केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली गावात ही संतापजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, चांडोली येथील एका कार्यक्रमात आरोपी आचाऱ्याचं काम करत होता. त्या कार्यक्रमात पीडित मुलगी देखील होती. ती वॉशरूमला गेली. मुलगी वॉशरूमला गेली असल्याचं पाहताच आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडितेनं आपल्या बहिणीला आपबिती सांगितली. तिने थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडिता बेपत्ता झाली.

तीन दिवसानंतर चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर पीडितेची चप्पल आणि ओढणी पोलिसांना सापडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर पीडितेने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सध्या NDRF च्या दोन पथकांकडून भीम नदीवरील बंधाऱ्याजवळ शोधमोहीम सुरु आहे. शोधकार्य सुरू असून अद्याप पीडितेचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

अत्याचार झाल्यानंतर मुलगी संपर्कात नसल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे. पोलिस आणि NDRF च्या दोन पथकांकडून शोधकार्य सुरू असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT