dr narendra dabholkar & supriya sule saam tv
मुंबई/पुणे

Narendra Dabholkar Murder Case: डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांना न्याय देण्यात उशीर झाला : सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीवर सातत्याने खोटे आरोप केले जातात असेही खासदार सुळेंनी नमूद केले.

मंगेश कचरे

बारामती : डाॅ. नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी माेठं याेगदान आहे. त्यांच्या मारेक-यांना शिक्षा अथवा तपासास वेळ लागत आहे हे खरं आहे. त्यांचे मारेकरी आता सापडले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्या क्रूर हत्येचा सर्वांनी निषेध केला आहे. या गोष्टी महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे मत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी व्यक्त केले. (narendra dabholkar latest marathi news)

नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांची हत्या हाेऊन नऊ वर्ष झाली. अद्याप मारेक-यांनी शिक्षा झालेली नाही हे खरे आहे. त्यावर कार्यवाही हाेईल परंतु पूराेगामी महाराष्ट्रात असं पुन्हा हाेऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे असे खासदार सुप्रिया सुळेंनी नमूद केले.

दरम्यान महाविकास आघाडीवर सातत्याने खोटे आरोप केले जातात. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने मविआस टार्गेट केले जात असल्याचेही एका प्रश्नावर सुळेंनी उत्तर दिले. याबराेबरच देशासमोर महागाईचे खूप मोठे आव्हान उभं ठाकले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT