दादांसमोर सुप्रिया सुळे म्हणाल्या; ३ पर्यंतच पब्लिसिटीसाठी वेळ, त्यानंतर सगळे चॅनल राऊत टेक ओव्हर करणार Saam TV
मुंबई/पुणे

दादांसमोर सुप्रिया सुळे म्हणाल्या; ३ पर्यंतच पब्लिसिटीसाठी वेळ, त्यानंतर सगळे चॅनल राऊत टेक ओव्हर करणार

'मिडियावाले नेते मंडळी काय काय बोलतात यावर एकमेकांच्या कमेंट्स घेतात आणि आमच्या कमेंट्स चालवतात मग, तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सकाळ 3km आयोजित जनसेवक पुण्याचा गौरव सोहळा या कार्यक्रमा निमित्त एकाच व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी एक मिश्कील टिप्पणी केली त्या म्हणाल्या, 'मिडियावाले नेते मंडळी काय काय बोलतात यावर एकमेकांच्या कमेंट्स घेतात आणि ते आमच्या कमेंट्स चालवतात मग, तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत. असं त्या म्हणाल्या.

दरम्यान तिथे उपस्थित चंद्रकांत पाटील यांना उद्देशून त्या म्हणाल्या आज ३ वाजेपर्यंत आम्ही चालणार दुपारी मग संजय राऊत टेक ओव्हर करतील, असही त्या यावेळी म्हणाल्या त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज चार वाजता होणारी पत्रकार परिषदेची (Press conference) उत्सुकता राजकीय नेत्यांनाही लागून असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी व्यासपीठावर बोलताना सुप्रिया सुळे यांचा उल्लेख राज्यसभेच्या खासदार म्हणून केला, मात्र चूक लक्षात येताच त्यांनी 'काल राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेखही मुख्यमंत्री म्हणून केला होता याची आठवणही करून दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT