Supriya Sule 
मुंबई/पुणे

'दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही'

विकास काटे, ठाणे

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. या विषयावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिलाे. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विराेधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही. supriya-sule-on-income-tax-department-raid-ajit-pawar-relatives-thane-marathi-news-sml80

ज्यांच्यावर हे धाडसत्र सुरु आहे. ते केवळ दादांचे नातेवाईक नाहीत तर आमचे देखील नातेवाईक आहेत. आमचे एकत्र कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्रचा सह्याद्री दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि झुकणार ही नाही असे खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

दरम्यान आयकर भरले जात नाही का या प्रश्नावर सुळे म्हणाल्या जे धाडी टाकतात त्यांनाच विचारा. राजकीय सूड उगवला जात आहे का? महाराष्ट्रातील हे राजकारण अपेक्षीत आहे का? यावर सुळे म्हणाल्या आम्ही असले राजकारण केले नाही. आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिलाे. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विराेधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही असेही खासदार सुळेंनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT