पुण्याच्या कचरा प्रकल्पाच्या निधीबाबत ईडी व सीबीआय चौकशी करा- सुप्रिया सुळेंची मागणी - Sagar Awhad
मुंबई/पुणे

पुण्याच्या कचरा प्रकल्पाच्या निधीबाबत ईडी व सीबीआय चौकशी करा- सुप्रिया सुळेंची मागणी

सागर आव्हाड,सामटीव्ही, पुणे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या PMC कचरा Gargage प्रकल्पाच्या निधीची सीबीआय CBI आणि ईडी ED मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी येथे केली. आज सुळे यांनी महापालिकेच्या कचरा डेपो परिसराची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. Supriya Sule Demand ED Inquiry in Pune Garbage Depot

पुण्यातील रामटेकडी येथील कचरा डेपो दीड वर्ष बंद आहे. या कचरा डेपोची पाहणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या कचरा डेपोच्या कामात 200 कोटींचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी ईडी किंवा सीबीआयने करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हे देखिल पहा

त्या म्हणाल्या, "मागील काही दिवसात देशभरातील अनेक नेत्यांच्या सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहे. मात्र त्या पैशातून कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT