Sunday Mega Block Saam Tv
मुंबई/पुणे

Sunday Mega Block: रविवारी बाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघा! 'या' मार्गांवर लोकलच्या फेऱ्या रद्द

Sunday Mega Block: मुंबईत रविवारी २२ नोव्हेंबरला मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा प्रभावित होणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Sunday Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या रविवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या मेगा ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि पश्चिम मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कुठे आणि किती वाजता ब्लॉक?

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी २.१७ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्धजलद लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या अतिरिक्त स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी २.५८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद आणि अर्धजलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकानंतर या गाड्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. या सेवांनाही सुमारे १० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहेत. डाऊन दिशेच्या गाड्या ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून, तर अप दिशेच्या गाड्या कल्याण-ठाणे किंवा विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द

हार्बर मार्गावरही रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.४७ दरम्यानच्या लोकल रद्द राहतील. तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या सकाळी १०.०६ ते सायंकाळी ४.४३ दरम्यानच्या लोकलही रद्द करण्यात येतील. पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी ९.१२ ते दुपारी ३.२० दरम्यानच्या लोकल रद्द राहतील. तर गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या सकाळी ९.१३ ते सायंकाळी ५.१३ दरम्यानच्या सेवाही बंद असतील.

पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेने चर्चगेट (churchgate) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घोषित केला आहे.  हा ब्लॉक रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईनवर असणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान स्लो लाईनच्या सर्व उपनगरीय गाड्या फास्ट लाईनवरून चालवण्यात येतील. या कामामुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहेत. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांपर्यंतच चालवल्या जातील

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

मेगा ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. तसेच नेरुळ/बेलापूर ते उरणदरम्यान पोर्ट लाईनच्या सेवाही सुरू असतील. महत्त्वाचे म्हणजे, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुष्कर मेळ्यात मध्य प्रदेशच्या ‘काळा बादल’ची चर्चा; अवघ्या २० महिन्यांत वजन ७६० किलो

Maharashtra News Live Update: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली

लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन! पुण्यात बड्या नेत्यांची खलबतं,राहुल गांधींकडे जाणार महाराष्ट्राचा रिपोर्ट

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाकडून महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण

राज्यातील सैनिकी शाळांचं ऑडिट होणार! फडणवीसांचा मोठा निर्णय; अनेक शाळांवर कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT