Subodh bhave
Subodh bhave Saam Tv
मुंबई/पुणे

राजकारण्यांवर नेमकं काय बोलला?; सुबोध भावेने संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करुन दिले स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) राजकारण्यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला. 'ज्यांची लायकी नाही अशा राजकारण्यांच्या हाती आपण देश सोपवून मोकळं झालो, आपण देशाचा विचार करत नाही'. असं विधान सुबोध भावेंनी केले होते. यावरुन आज दिवसभरात चांगलीच चर्चा झाली. यावर आता सुबोध भावे याने संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. (Subodh Bhave Latest Speech)

काय आहे फेसबुक पोस्ट?

नमस्कार,

काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ.

(कुठेही कट न करता जसाच्या तसा)

आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे.

पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची.

माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो.

पण त्या आधी एकदा "संपूर्ण भाषण" त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.

आपला,

सुबोध भावे

जय हिंद!

जय महाराष्ट्र!

काय आहे प्रकरण?

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते .

यावेळी भाषणात बोलताना सुबोध भावे यांनी 'ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर 'आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील. पण त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलय ते आपल्या समोर आहे' असंही सुबोध भावे म्हणालेत. (Subodh Bhave Marathi News)

स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही, असं म्हणत सध्याचे राजकारण आणि राजकारणी यांच्यावर सुबोध भावे यांनी टीका केली आहे. 'चांगला देश निर्माण करायचा असेल तर येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण देऊन राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल'. असंही ते यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

KKR vs DC: कोलकताच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; KKRसमोर १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

SCROLL FOR NEXT