Murbad Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Murbad Politics : CM शिंदेंचे खंदे समर्थक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; सुभाष पवार वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

Murbad Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंचे खंद्या समर्थकाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं आहे. यामुले आता ते त्यांच्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

अजय दुधाणे

बदलापूर : एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक सुभाष पवार यांनी सोमवारी शरद पवार गटात प्रवेश केला. सुभाष पवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं आहे. सुभाष पवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. सुभाष पक्षप्रवेश करताच मतदारसंघात ते वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळत सुरु झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार अशी थेट लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. सुभाष पवार यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार यांचा किसन कथोरे यांनी २००९ आणि २०१४ अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव केलाय. या दो पराभवानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता. त्यामुळे आता सुभाष पवार हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे मुरबाडवासी मतदारांचं लक्ष लागलं आहे.

सुभाष पवार हे शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुरबाडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुरबाडमधून विद्यमान आमदार किसन कथोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सुभाष पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी फुंकली. त्यामुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कथोरे विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

सुभाष पवार यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार हे मुरबाड विधानसभेतून चार वेळा आमदार राहिले आहेत. मात्र आमदार किसन कथोरे यांनी २००९ आणि २०१४ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतला. त्यामुळे आता वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सुभाष पवार यांना चालून आली आहे. त्यासाठीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत कथोरे यांना आव्हान दिलं आहे. आता या निवडणुकीत काय होणार? याकडे मुरबाडवासीयांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुभाष पवार यांनी मात्र विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT