मुंबई: १२ परीक्षेचा (HSC Exam) अभ्यास होत नसलयाच्या कारणावरून मालाडच्या मालवणी परिसरात एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिव्या गमरे असे या मुलीचे नाव आहे. अभ्यास होत नसल्या कारणाने दिव्या ही मानसिक तणावात होती. याच नैराक्षेतून दिव्याने बुधवारी मालाडच्या खारोडी, इनसवाडी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी मालवणी पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत.
दरम्यान बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. कोरोनामुळे (Corona) शाळा कधी सुरु तर कधी बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. आणि याच नैराश्यातून आणि अभ्यास होत नसल्यानं दिव्यानं हे पाऊल उचलले आहे. घरच्यांनी तिच्या खोलीत जाऊन बघितले असता दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर घरच्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचानामा आहे.
मागच्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली सगळे जगत आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील की नाही आणि झाल्याच तर त्या कशा होतील या संभ्रमात विद्यार्थी आहेत. यंदा ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता परत सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.