Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: वाढदिवशीच तरुणावर काळाचा घाला! सेल्फी काढण्याच्या नादात बुडून मृत्यू

सेल्फी काढण्याचा नादात ही घटना घडल्याची माहिती देखील समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. वाढदिवसानिमित्ती फिरायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील चास येथील घोडनदीवर ही दुर्देवी घटना घडली आहे. सेल्फी काढण्याचा नादात ही घटना घडल्याची माहिती देखील समोर येत आहे. (Latest Marathi News)

साईप्रसाद वेन्नपूसा बालमलकोंडा असं मृत तरुणाचं नाव आहे. साईप्रसाद मुळचा आंध्र प्रदेशातील होता, मात्र शिक्षणानिमित्त तो पुण्यातील  नारायणगाव येथे राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, साईप्रसाद वाढदिवस असल्याने कॉलेजला न जाता मित्रांसोबत चास येथे फिरायला गेला होता. तेथे घोडनदीत असलेल्या रांजण खळग्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. येथे सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला.

साईप्रसाद जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रा.प.सबनीस महाविद्यालयात कॉमर्स शाखेत बारावीत शिकत होता. वाढदिवसानिमित्त फिरायला गेलेल्या साईप्रसादवर काळाने घाला घातला. रांजण खळगे खूप खोल असल्याने घोडेगाव पोलीस आणि नागरिकांनी बराच शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

SCROLL FOR NEXT