Pimpri Chinchwad, Stray Dogs, Kid, Boy saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी; पालकांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर राेष

या घटनेमुळे छाेट्या मुलांत भटक्या कुत्र्या विषयी मोठी दहशत निर्माण झाली आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाणारी एम्पायर स्क्वेअर सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी (stray dogs) एका चार वर्षाच्या मुलावर (boy) जीवघेणा हल्ला केला आहे. आरव वर्मा असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

एम्पायर स्क्वेअर ही पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये जागोजागी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तसेच सुरक्षा रक्षक तैनात आहेत. या साेसायटीत भटक्या कुत्र्यांनी शिरून चिमुकल्या आरव वर्मा याच्यावर जीवघेणा हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी त्याला तीन ठिकाणी चावा घेऊन गंभीर जखमी केले. या घटनेमुळे छाेट्या मुलांत भटक्या कुत्र्या विषयी मोठी दहशत निर्माण झाली आहे.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग अक्षरशः अपयशी पडल्याचं आरोप देखील आरवच्या पालकांनी केला आहे. आमची सोसायटी वारंवार पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाशी पत्रव्यवहार करून देखील महापालिकेने भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त केला नाही असा आरोप आरव वर्माची आई अंजली श्रीवास्तव आणि वडील साकेत यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT