Rupali Chakankar : 'महिलांना वाईन चालेल का? हे मी रुपाली चाकणकरांच्या घरात जाऊन विचारणार आहे' Saam TV
मुंबई/पुणे

'महिलांना वाईन चालेल का? हे मी रुपाली चाकणकरांच्या घरात जाऊन विचारणार आहे'

रुपाली चाकणकरांचे घराणे सुसंस्कृत आहे. मी आता त्यांच्या घरात जाऊन विचारतो की महिलांना वाईन चालणार आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार पत्रकार परिषद अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं, तसंच त्यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर देखील दिली आहेत.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेला आणि विरोध होत असलेला राज्य सरकारचा निर्णय म्हणजे किराणा दुकानात आणि मॉल मधील वाईन विक्रिचा आणि याच निर्णयाला महिला विरोध करत नाहीत असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women's Commission Chairperson Rupali Chakankar ) यांनी केलं होतं आणि त्यांच्या याच वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांनी चाकणकरांना टोला लगावला आहे.

महिलांना वाईन चालणार आहे का?

पाटील म्हणाले, रुपाली चाकणकरांचे घराणे हे सुसंस्कृत आहे. मी आता त्यांच्या घरात जाऊन विचारतो की महिलांना वाईन चालणार आहे का? रुपालीताईंनी हा शोध लावला की महिलांनी वाईनला विरोध केला नाही, तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी आहात, तुम्ही एका सुसंस्कृत घरातील आहेत त्यामुळे तुम्ही वाईनला विरोध करा असही पाटील (Chandrakant Patil) यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान त्यांनी यावेळी संजय राऊतांवरतीही टीका केली 'मी संजय राऊत यांना फार सिरीयस घेत नाही. तसंच राऊतांना आरोप सहन न झाल्याने त्यांनी सोमय्यांवरती हल्ला केला मग पत्रकार परिषदेतून टीका केली. शिवाय घरात घुसू देणार नाही, नागपुरात फिरू देणार नाही, असं ते म्हणतात याचा अर्थ राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय?' असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

महायुतीत मोठी बंडखोरी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना?

SCROLL FOR NEXT