Maharashtra Women’s Commission issues notice to J.J. Hospital dean over pending harassment complaint. saam tv
मुंबई/पुणे

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

State Women Commission: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीबाबत अहवाल सादर न केल्यानं तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना नोटीस बजावली आहे.

Bharat Jadhav

डॉक्टर महिला आणि स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिकेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणं जेजे रुग्णालयाला महागात पडलंय. राज्य महिला आयोगानं दखल घेत रुग्णालयाला नोटीस बजावलीय. सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका आणि डॉक्टर महिलेने विभागप्रमुखाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर काही कारवाई न झाल्यानं महिला आयोगानं संताप व्यक्त केलाय.

महिला डॉक्टरनं विभागप्रमुखाकडून त्यांना होत असलेल्या सततच्या मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे १० जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने रुग्णालय प्रशासनाकडून दोनवेळा, दिनांक १८ जुलै २०२५ आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मागविला होता.

रुग्णालय प्रशासनाने अहवाल सादर न केल्याने याची गंभीर नोंद घेत आयोगाने याप्रकरणी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोग कार्यालयात सुनावणी घेतली. सुनावणीस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उपस्थित व्यक्तीस तक्रार आणि त्यावर रुग्णालयाने केलेली कार्यवाही याबाबत कुठलीही माहिती नव्हती. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने न घेणे आणि आयोगाने मागितलेली माहिती वेळेत न देता, सहकार्य न करणे या गंभीर मुद्द्यांची नोंद घेत आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.

रुग्णालय आस्थापनेकरिता स्थापित अंतर्गत समिती (IC) कमिटीची संपूर्ण माहिती, तक्रारदार महिलेच्या तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणती दखल घेतली आहे याबाबत सविस्तर अहवाल तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा

महत्वाच्या जबाबदा-या सोपविल्यामुळे ते पुन्हा अर्जदार डॉक्टर महिलेस मानसिक त्रास देत असल्याची बाब शासनाला अवगत केली का याचा सविस्तर खुलासा सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT