BMC Election: मुंबईच्या नव्या वाॅर्डरचनेची परिसीमन अधिसूचना जारी  SaamTV
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबईत नऊ नवे वाॅर्ड होणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या नव्या परिसीमनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही अधिसूचना जारी केली आहे.

सुमित सावंत

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या नव्या परिसीमनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही अधिसूचना जारी केली आहे. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या प्रारुप वाॅर्ड रचनेची माहिती यात देण्यात आली असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवायही निवडणूक (Election) होणार आहे. (State Election commission notification about BMC New Wards)

या प्रारुप रचनेनुसार मुंबईत (Mumbai) ९ वॉर्ड वाढले आहेत. शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात प्रत्येकी तीन वाॅर्ड वाढले आहेत. नव्या रचनेनुसार आता मुंबईत वाॅर्डांची संख्या २३६ होईल. त्यातले ११८ वाॅर्ड महिलांसाठी राखीव आहेत. एकूण वाॅर्डरचनेत एससी साठी १५ ते एसटी साठी २ जागा राखीव आहेत. महिलांसाठी एससी प्रवर्गात ८ तर एसटी प्रवर्गात एक जागा राखीव आहे.

असे असेल वेळापत्रक-

अधिसूचनेवर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत तक्रारी आणि सूचना मागवल्या जातील .

16 फेब्रुवारी रोजी तक्रार सूचनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे.

16 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत तक्रारीचा निवारण करण्यात येणार आहे

अंतिम यादी 2 मार्च रोजी दिली जाईल

त्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल

त्यानंतर निवडणूक जाहीर होईल

एसी आणि एसटीसाठी प्रभाग आरक्षण ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांनीच पोलिसाला मारलं; बुलढाण्यात रक्तरंजीत थरार, नेमके काय घडले?

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Green Tea Benefits: वजन कमी, ग्लोईंग स्किन अशा अनेक फायद्यांसाठी दिवसातून एकदा प्या हे खास ड्रिंक

आताची सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट

Back pain causes: सतत होणाऱ्या पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करताय? या गंभीर समस्येचं आहे लक्षण

SCROLL FOR NEXT