Tushar Bhosale Saam Tv
मुंबई/पुणे

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पांडुरंगाचे चरणस्पर्श दर्शन सुरु करा; आचार्य तुषार भोसलेंची मागणी

अन्यथा हजारो भाविक-भक्तांसह थेट गाभाऱ्यात प्रवेश करुन चरणस्पर्श दर्शन घेणार असल्याचे भोसले म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मागिल दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) सगळीकडे निर्बंध लादले आहेत. मंदीरांवरही निर्बंध लादण्यात आले आहे. आता काही दिवसांपासून मंदिर सुरु करण्यात आली आहेत पण अजुनही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात चरणस्पर्श दर्शन सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे भक्तांना अजुनही गाभाऱ्यात दाऊन दर्शन घेता येत नाही. पाढव्या पासून चरणस्पर्श दर्शन सुरु करण्याची मागणी भाजपचे (BJP) अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे.

तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी या मागणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. कोरोनामुले गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरांवर निर्बंध लादले आहेत. काही मंदीरात ऑनलाईन पास काढून दर्शन सुरु आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सुर आहे.

पाढव्यापासून हिंदुचे नवे वर्ष सुरु होते. त्यामुळे या दिवसापासूनच पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात असलेले निर्बंध काढून भाविकांना चरणस्पर्श दर्शन पुन्हा सुरु करावे नाहीतर पाढव्या दिवशी नाईलाजाने आम्ही थेट गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श घेणार असल्याचे तुषार भोसले (Tushar Bhosale) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Killed: तरूण शेतकऱ्याची निर्घृण हत्या; मृतदेहाजवळ रात्रभर वृद्ध आई बसून राहिली, अख्खं गाव हळहळलं

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

RSS आणि भाजप नेत्यामध्ये जोरदार हाणामारी; पोलीस स्टेशनबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा, परिसरात तणावाचं वातावरण

Kalyan Pali Bus : कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा; वेळापत्रक जाणून घ्या

Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

SCROLL FOR NEXT