BMC: बेस्टच्या तुटीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी
BMC: बेस्टच्या तुटीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी Saam Tv
मुंबई/पुणे

BMC: बेस्टच्या तुटीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी

सुमीत सावंत

मुंबई : मुंबईकरांची उपजीवनवाहिनी म्हणजेच बेस्ट उपक्रमाच्या २०२२-२३ या वर्षासाठी २२०० कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प फसवा आणि बेकायदेशीर असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. तर बेस्टने पालिकेकडून अनुदान मिळेल या आशेवर न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे असा सल्ला आता काँग्रेसकडून देण्यात येत आहे. या तुटीच्या अर्थसंकल्पाला भाजपाने विरोध केला असला तरी त्या विरोधाला न जुमानता अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला आहे. 

आज बेस्टचा (Best Bus) अर्थसंकल्प स्थायी समिती मध्ये मंजुरीसाठी आणण्यात आला होता. स्थायी समितीत हा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प पालिका सभागृहाकडे पाठवला असून त्याठिकाणी चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ चा २२३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. बेस्ट समितीच्या मंजुरी नंतर हा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला होता. यावेळी बोलताना पालिकेच्या नियमानुसार १ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. मात्र हा अर्थसंकल्प २२३६ कोटी तुटीचा सादर करण्यात आला आहे. मागील वर्षापर्यंत बेस्टला ६६०० कोटींची तूट होती. आताची तूट धरून बेस्ट उपक्रमाला ९ हजार कोटींची तूट आहे. ही तूट पालिका भरून काढणार आहे का असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. बेस्ट स्वतःचा ३३३७ बसचा ताफा आहे, तो तसाच ठेवेल असा करार पालिका आणि बेस्टमध्ये झाला आहे. आज बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या २१९४ बसेस आहेत.

या आधीही पालिकेने बेस्टला सुमारे ४५०० कोटी रुपये दिले आहेत . त्यानंतरही बेस्ट आर्थिक संकटातून बाहेर आलेली नाही . बेस्टला एकूण ९ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे . इतकी रक्कम पालिकेला द्यावी लागणार आहे . बेस्ट उपक्रम सतत पालिकेच्या जीवावर जगणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत बेस्स्टकडे ३२० एकरची जागा आहे. या जागांचा विकास करून बेस्टने जी तूट आहे ती तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या जागांचा विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी सूचना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

यावर बेस्टच्या वीज विभागात तूट दिसत असली तरी यापुढे एमईआरसीच्या सुचनेप्रमाणे वीज विभागाचे वेगेळे अकाउंट ठेवले जाणार आहे. भविष्यात ही तूट दिसणार नाही. बेस्टच्या वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नेटवर्क चांगले करण्यासाठी कॉल सेंटर व स्मार्ट मीटर लावले जातील. असे केल्याने कंट्रोल रूममध्ये कुठे फॉल्ट आहे हे समजेल. बेस्टच्या ताफ्यात पुढील १८ महिन्यात २१०० बसेस येणार आहेत. बेस्टकडे सध्या २८६ इलेक्ट्रिक बसेस आहेत, मार्च २०२३ पर्यंत बेस्टच्या ५० टक्के बसेस इलेक्ट्रिकच्या असतील. प्रवाशांसाठी डिजिटल तिकीटिंग, बस कधी येणार याची माहिती मिळेल. या माध्यमातून प्रवासी वाढवून महसूल वाढवला जाईल. बेस्टला पालिकेने ४४५० कोटींचे अनुदान देऊन सहकार्य केले आहे. बेस्टला २२३६ कोटी तुटीसह ६६०० कोटींची देणी आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT