Aaditya Thackeray On NDA Government  Saam Tv
मुंबई/पुणे

NDA Government: 'लोकसभेच्या सभापतीपदासाठी ठाम राहा, नाहीतर भाजपवाले...', ठाकरेंनी नितीश-नायडूंना दिला सल्ला

Aaditya Thackeray On NDA Government: आदित्य ठाकरे यांनी एनडीएच्या सरकार स्थापनेवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सल्ला दिला आहे.

Satish Kengar

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रात एनडीए स्थापनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार स्थापन करण्यात तेलगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेड महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या दोघांनीही लोकसभा अध्यक्षपदासाठी ठाम राहावे.

X वरील एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी दावा केला आहे की, ''भाजप ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. नव्या एनडीएच्या संभाव्य मित्रपक्षांना ही नम्र सूचना आहे. आधी सभापतीपद मिळवा.''

असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ''भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, तुमच्यासोबत सरकार बनवताच ते आश्वासने मोडतील आणि तुमचे पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील. याचा अनुभव तुम्ही आधीच घेतला असेल.'' दरम्यान, सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताच्या तुलनेत भाजप कमी पडत असल्याने, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी तिसऱ्या टर्मसाठी टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे.

एनडीएला एकूण 293 जागा मिळाल्या असून, त्यापैकी भाजपकडे 240 जागा आहेत. टीडीपी 16 खासदारांसह एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि जेडीयू 12 खासदारांसह एनडीए मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर युतीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तसेच त्यांनी केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण पत्र देण्याची शक्यता आहे. मोदी आणि नवीन मंत्रिमंडळातील काही सदस्य रविवारी संध्याकाळी शपथ घेण्याची शक्यता आहे. 1962 नंतर (पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर) ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादा नेता दोन टर्म पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT