st strike Saam Tv
मुंबई/पुणे

ST Strike: आझाद मैदानावरील ST कर्मचाऱ्याला आली चक्कर, 12 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

आझाद मैदानावरील काही आंदोलक कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग देखील सूरु केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचारी मागील 4 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अनेक चर्चा आणि परिवहन मंत्र्यांनी पगारवाढ केली तरिही आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. हे आंदोलन करत असतानाच आता काही कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग देखील सूरु केला आहे. अन्न त्याग केलेल्या अशाच एका कर्मचाऱ्याला चक्कर आली असून त्यालाजीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अन्नत्याग आंदोलनाचा हा 12 वा दिवस आहे.

विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी (ST Employee) ठाम आहेत. या मागणीसाठी राज्यातील विविध भागांतून आझाद मैदानात मोठय़ा संख्येने एसटी कर्मचारी आंदोलनासाठी आले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यासाठी शासनाकडून तीनसदस्यीय समितीही नेमण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत दिली. मात्र कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. सध्या अधिवेशन सुरू असून हा मुद्दा पुन्हा आक्रमकपणे मांडण्यासाठी मंगळवारी राज्यभरातून आझाद मैदान येथे एसटी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आल्याची माहिती लढा विलीनीकरणाचे सदस्य व एसटी कर्मचारी सतीश मेटकरी यांनी काही दिवसांपुर्वी दिली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा राजीनामा

स्वेच्छेने वेश्याव्यवसाय गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाने कायद्यावरच बोट ठेवलं

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिर्डीत दाखल

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

SCROLL FOR NEXT