ST Bus Strike: तळेगाव दाभाडे आगराचे दोन कोटींचे नुकसान; एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

ST Bus Strike: तळेगाव दाभाडे आगराचे दोन कोटींचे नुकसान; एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

मागील बेचाळीस दिवसांपासून एसटी (ST Bus) कर्मचाऱ्यांचे तळेगाव दाभाडे आगारात कामबंद आंदोलन (Agitation) सुरू आहे.

दिलीप कांबळे

मावळ: मावळमधील तळेगाव दाभाडे एसटी बस आगार हे महत्त्वाचे आगार म्हणून ओळखले जाते. राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील बेचाळीस दिवसांपासून एसटी (ST Bus) कर्मचाऱ्यांचे तळेगाव दाभाडे आगारात कामबंद आंदोलन (Agitation) सुरू आहे. मात्र खेडेगावची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लालपरी संपामुळे आगारातच उभी आहे. या काळात तळेगाव आगराचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. (ST Bus Strike: Talegaon Dabhade bus depot loses Rs 2 crore; ST workers strike continues)

हे देखील पहा -

संपामुळे मावळ (Maval) तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणाला मोठा ब्रेक लागला आहे. शाळेचे विद्यार्थी आणि नागरिक हैराण झाले आहे. मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी जनतेची माफी मागितली आहे. तुम्ही पण आम्हाला साथ द्या असे आवाहन केले आहे. आमचा लढा तुमच्यासोबत नसून सरकार सोबत आहे. खासदार आमदार यांचं वेतन वाढ होते ते विधायक दोन मिनिटात मंजूर होते.आमच्या वेतन वाढीचा मुद्दा येतो तर दोन महिने. एस टी कर्मचारी रस्त्यावर असतात. मात्र आमची वेतन वाढ होण्याची वेळ येते त्यावेळी आम्हाला सरकार धमक्या देते.

मेस्मा कायदा सेवा समाप्ती केल्या जाते, आम्हाला उधड्यावर टाकण्याचा सरकार प्रयत्न करतात.याला राज्य सरकार जबाबदार आहे असे मत एस टी कर्मचारी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान तळेगाव आगारातील 197 कर्मचाऱ्यांपैकी 180 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एस टी डेपोत शुकशुकाट असल्याचं चित्र निर्माण झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतीला फटका; बळीराजा चिंतेत

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT