Special Traffic Block Today on Mumbai pune Expressway What are alternative modes of transport Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?

Satish Daud

Mumbai-Pune Expressway Special Block: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. एक्सप्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज म्हणजे शुक्रवारी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान वाहतूक पूर्णत: बंद असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर शुक्रवारी ग्रँटी बसविण्याचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ वाजेच्या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या ब्लॉकमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Expressway) अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. हीच बाब लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील.

हेच सीसीटीव्ही (CCTV) अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. त्याचबरोबर बेजबाबदारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी मदत करतील, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, महामार्गावर घेण्यात येणाऱ्या या दोन तासांच्या विशेष ब्लॉकमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. खंडाळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांना वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरुन जाता येईल. असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT