Pune Porsche Car Accident Case Saam Digital
मुंबई/पुणे

Special Report : पोरानं चिरडलं, अख्खं कुटुंब तुरूंगात गेलं; 3 पिढ्या गजाआड

Pune Porsche Car Accident Case Update : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याने पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केलीय.

Sandeep Gawade

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याने पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केलीय. त्यामुळे आता अख्खं अग्रवाल कुटूंब गजाआड केलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आधी मुलगा, मग वडील विशाल अग्रवाल...त्यांच्यानंतर आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि आता तर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपीची आई शिवानी अग्रवालला गडाआड करण्यात आलंय. त्यामुळे पोराच्या करामतीमुळे अख्खं अग्रवाल कुटूंबालाच तुरुंगाची हवा खावी लागतीय.

अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांचा बळी घेतला. मुलाला वाचवण्यासाठी आई शिवानी अग्रवालनं स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले.तर वडील विशाल अग्रवालनं मुलाला वाचवण्यासाठी अनेकांना लाच दिली तर आजोबा सुरेंद्र अग्रवालला पोर्शे गाडीच्या चालकाला डांबल्याप्रकरणी अटक झालीय. या आरोपांमुळे पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अख्खं अग्रवाल कुटूंब तुरुंगात गेलंय.

तर पैशांसाठी या कुटुंबाला कायदे धाब्यावर बसवून मदत करणा-या ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही गजाआड करण्यात आलंय.ससूनचे फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरेला आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार आणि चुकीचे रिपोर्ट दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोरला आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार आणि चुकीचे रिपोर्ट दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळेला रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण केल्यामुळे तुरूंगात जाव लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT