Special Report  Saam Digital
मुंबई/पुणे

Special Report : मनोरमा खेडकरांच्या डिमांडने पोलीसही हैराण?; तुरूंगात चक्क फळं आणि चॉकलेटची मागणी?

IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar : वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर मुळशीतील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातही मनोरमा यांनी चॉकलेट आणि फळ मागीतल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

वादग्रस्त पूजा खेडकरची करामती आई मनोरमा खेडकर मुळशीतील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातही मनोरमाबाईंचा मिजास कमी व्हायला तयार नाही. मनोरमाबाईंनी तुरूंगात चक्क फळं आणि चॉकलेटची मागणी केलीय. त्याचे किस्से तुरुंगाबाहेर यायला सुरुवात झालीय.

मनोरमाबाईंनी केलेल्या या स्पेशल डिमांड मात्र पोलिसांनी धुडकावून लावल्या आहेत. तर दुसरीकडे मनोरमा खेडकरांच्या वादग्रस्त प्रकरणांची मालिका सुरूच आहे. त्यांच्या घटस्फोटाचाही वाद समोर आलाय. केंद्रानं मनोरमा आणि दिलीप खेडकरांच्या घटस्फोट प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता याची सीआयडी चौकशी होणार आहे. मात्र तरीही मनोरमा खेडकरांची मुजोरी काही कमी झालेली नाही. त्यामुळेच तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना नको ते उद्योग सूचतायेत.

पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्यांनी आपल्या आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याचीही खोटी माहिती दिली असून उत्पन्नही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता याप्रकरणाची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा खरच घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहे. याबाबत सविस्तर अहवालही केंद्र सरकारने मागविला असल्याने पूजा खेडकरसह त्यांच्या कुटुंबीयांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT