गणेशोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार.
मेट्रो लाईन 2A आणि लाईन 7 वर ही विशेष सेवा उपलब्ध असेल.
ही सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान असेल.
प्रवाशांना वाहतूक कोंडी टाळून सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळेल.
मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने मोठा निर्णय घेतला आहे. आता मेट्रो लाइन 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि मेट्रो लाइन 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील गाड्या रात्री 11:00 ऐवजी 12:00 वाजेपर्यंत धावतील. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मेट्रो सर्वात सुरक्षित, जलद प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. MMRDA च्या या निर्णयामुळे मुंबईतील भाविकांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
सोमवार ते शुक्रवार - एकूण 317 फेऱ्या
आधी फक्त 305 फेऱ्या होणार
Peak hours मध्ये दर 5 मिनिटे 50 सेकंदांनी मेट्रो धावणार
Non-peak hours - दर 9 मिनिटे 30 सेकंदांनी मेट्रो धावेल.
शनिवार - आता 256 फेऱ्या होतील. आधीच्या 244 फेऱ्या होत होत्या. तर शनिवारी Peak hours मध्ये दर 8 मिनिटांनी मेट्रो धावेल. Non-peak hours मध्ये दर 10 मिनिटे 25 सेकंदांनी मेट्रो सुटेल.
एकूण 229 फेऱ्या. आता यात १२ फेऱ्या वाढणार. तर दर 10 मिनिटांनी मेट्रो धावेल. आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी चालवल्या जाणार असल्याची माहिती MMRDAने दिलीय.
"गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा असून लाखो भाविक 11 दिवस मुंबईभर प्रवास करत असतात. त्यांना मध्यरात्रीपर्यंत सुरक्षित प्रवास मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे Metro Line 2A आणि 7 या मार्गिकांवरील सेवा वाढवण्यात आलीय. यामुळे भाविकांना शहरभरातील गणेश मंडळांना सहज जाता येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई - मडगावदरम्यान 8 डब्याची वंदे भारत ट्रेन धावते. आता गणेशोत्सवानिमित्त खास वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असून या ट्रेनला 16 डब्यांची असणार आहे. गणेशोत्सवात प्रवाशांची दगदग होऊ नये, यासह प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.