Mumbai Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' भागात सलग दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

South Mumbai Water Supply Closed: दक्षिण मुंबईत ६ आणि ७ जूनला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन बीएमसीने केलं आहे.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ६ आणि ७ जून रोजी दक्षिण मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. संबंधित विभागातील नागरिकांनीपाणी जपून अन् काटकसरीने वापरावं. संबंधित प्रशासनाला देखील सहकार्य करावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका करण्‍यात येत आहे.

तर दक्षिण मुंबईत नेमक्या कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Cut) राहणार आहे. तर करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळ येथे ६आणि ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बीएमसीने जुन्या आणि जीर्ण जलवाहिनींच्या बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीएमसीने ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) आणि तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे. यामुळे जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जून रोजी रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीकामासाठी १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार (South Mumbai Water Supply) आहे.

या दुरुस्ती कामादरम्यान जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ (Mumbai Water Supply) या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनींच्या बळकटीकरणाच्या कामामुळे पाणी पुरवठी बंद राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक (Mumbai News) आहे. संबंधित परिसरामधील नागरिकांनी पाण्‍याचा साठा पुरेसा करावा. पाणी जपून वापरावं, असं आवाहन देखील बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा विधेयक असं नाव करा - उद्धव ठाकरे

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

AC Servicing: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT