Pune Crime News, Pune Latest Marathi News
Pune Crime News, Pune Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

एका मुलाचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार दोघांवर; पुण्यातल्या घटनेने खळबळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे - एका घटनेने सध्या पुण्यात खळबळ उडाली आहे. एका कुंटूंबाने मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. मुठा नदीच्या कालव्यात पोहायला गेलेला मुलगा हरवला असल्याचे कुंटूंबाचं म्हणणे होते. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Police) तपास केला असता, त्यांना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख कुटुंबाला पटली. हा आपलाच मुलगा असल्याचं सांगत हे कुटुंब मृतदेह घेऊन गेलं आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. (Pune Latest Marathi News)

दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांना देखील एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. कुटूंबाला विचारले असता मुलगा आपलाच असल्याचं सांगत त्यावरही अंत्यसंस्कार केले. हडपसर पोलिसांनीही ओळख पटताच सोपस्कार करून मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला. त्याच्यावरही अंत्यसंस्कार झाले. यावेळी या कुटुंबाने आदल्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना काहीही सांगितलं नाही. आता दोन्ही मृतदेह एकाच मुलाचे कसे असू शकतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील पाहा -

याच संदर्भात माहिती घेण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी या कुटुंबाला फोन केला. तेव्हा त्यांनी अजबच दावा केला. हडपसरमध्ये सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा होता आणि स्वारगेट पोलीस कोणत्या मृतदेहाबद्दल बोलतायत हे आपल्याला माहित नाही, असं या कुटुंबाने सांगितले. त्यामुळे आता स्वारगेट पुन्हा एकदा त्या १६ वर्षीय मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान , मुठा कालव्यातच हरवलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाचा सिंहगड पोलीस देखील तपास करत बागेत. धायरीतला हा मुलगा आपल्या मित्रांसोबत कालव्याकडे फिरायला गेला होता , त्यानंतर तो गायब झाला. आता स्वारगेट पोलिसांना सापडलेला मृतदेह धायरीतल्या या मुलाचा असण्याची शंका सिंहगड पोलिसांना वाटत आहे. या धायरीतल्या मुलाच्या कुटुंबाला स्वारगेट पोलिसांनी आपल्याकडच्या मुलाच्या मृतदेहाचा फोटो दाखवला . पण हा आपला मुलगा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता या प्रकरणातला सखोल तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT