Varun Sardesai  SaamTvNews
मुंबई/पुणे

बातमी होईल या आशेने काहीजण शिवसेना नेत्यांवर टीका करतात : सरदेसाई

वरुण सरदेसाईंची भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीत आज पुन्हा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका आहे? असा सवाल  उपस्थित केला. दरम्यान याचवेळी कल्याणमध्ये युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई फुटबॉल चषक स्पर्धेसाठी आले होते आणि पत्रकारांनी त्यांना भाजप आमदर यांनी उपस्थित केलेल्या सवालाबाबत विचारले असता यावेळी देसाई यांनी भाजप आमदार यांना नाव घेता टोला लगावला आहे.

हे देखील पहा :

देसाई यांनी सांगितले की आपल्याला प्रकाश झोतात राहिला पाहिजे, आपल्या देखील मिडीयाने बातम्या कव्हर केल्या पाहिजेत. त्यामुळे ओढून ताणून शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांवर टीका करायची, पालकामंत्र्यावर टीका करायची ही काही लोकांची वृत्ती झालेली आहे.

चव्हाण नेमकं काय म्हणाले?

आज डोंबिवली भाजप आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की महायुतीत हिंदूत्वाचा धागा पकडून आम्ही एकत्रित राहिलो. आता बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. मलिकांविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका आहे? हे त्यांनी सांगावे, असे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT