Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC परिसरात सोसायट्यांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे!

ज्या सोसायटय़ा कोरोना नियम पाळणार नाहीत त्यांना पहिल्या वेळेस पाच हजार आणि दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सोसायट्यांवर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर काही निर्बंध लादले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांना पहिल्या वेळी ५ हजार आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपयाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कल्याण डोंबिवली आयुक्तांनी काढलेल्या नव्या आदेशात कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

तसेच घाऊक व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असल्यासच त्यांना प्रवेश देता येणार आहे. तर, बाजार समिती प्रशासनाने समितीच्या आवारात येणाऱ्या वाहनाची संख्येवर नियंत्रण न आणल्यास दुसऱ्या लाटेप्रमाणे ५० टक्केच वाहनांना आणि व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे निर्बंध लादले जातील असा इशारा आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला दिला आहे.

तर, शहरातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असून मॉल आणि मार्केटला देखील नियमाचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर ज्या सोसायटीतील 25 टक्के नागरीक पॉझीटीव्ह आल्यास त्या सोसायटीतील नागरीकांनी कोरोनाची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी. तसेच ज्यांनी लसीकरण केले नाही. त्यांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्या सोसायट्या कोरोना नियमांचे पालन करणार नाहीत त्या सोसायट्यांना पहिल्या वेळेस पाच हजार आणि दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT