Snake In ICU Saam TV
मुंबई/पुणे

Snake In ICU: हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शिरला साप; डॉक्टर आणि रुग्णांची पळापळ, VIDEO व्हायरल

Snake In Hospital ICU: प्रेम आहेर व अक्षय वेखंडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्याही रुग्णाला इजा न पोहचून देता सापाचा सुखरूप बचाव केला. कल्याणमधील पौर्णिमा टॉकीज जवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News:

कल्याणमध्ये साप मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढत आहेत. त्यात अजून एक धक्कादायक घटना घडलीये. कल्याणमधील पौर्णिमा टॉकीजजवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये साप शिरला. हॉस्पिटलमध्ये साप शिरल्याने रुग्णांची एकच खळबळ उडाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलेंडरवर साप दिसला. आयसीयूमध्ये रुग्ण असल्याने एकच धावपळ उडाली. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी याबाबत वॉर फाउंडेशनला माहिती दिली. प्रेम आहेर व अक्षय वेखंडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्याही रुग्णाला इजा न पोहचून देता सापाचा सुखरूप बचाव केला.

दरम्यान, पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून त्या पासून मानवाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. तसेच हा साप भक्षाच्या शोधात तिकडे आला असावा असा अंदाज सर्पमित्रांनी वर्तवलाय. साप लवकरच वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती प्राणीमित्र प्रेम आहेर यांनी दिली.

कल्याण (Kalyan) परिसरात झाडी असलेल्या ठिकाणी अनेकवेळा साप (Snake) आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. साप पाहून सर्वांनाच पळता भुई थोडी होते. आताही साप आल्याने रुग्णालयात ज्यांना धावता आणि पळता येत आहे ते पटकन बाजूला झाले. मात्र आजारी रुग्णांना कोणतीही हालचाल करता येत नसल्याने ते तेथेच राहिले. सुदैवाने यात कोणत्याही रुग्णाला सर्पदंश झालेला नाही.

आजवर सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये ८ फूटांचा साप थेट घराच्या छतात शिरला होता. घराच्या स्लॅबमधून हा साप खाली काढण्यात आला होता. यासह काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचून तिच्या अंगावर किंग कोब्रा साप सोडल्याची घटना घडली होती. यामध्ये महिला आणि तिच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT