Snake Hidden in Scooter  Saam TV
मुंबई/पुणे

Snake Hidden in Scooter : स्कूटरच्या इंजिनमध्ये लपाला साप; चालकाचं लक्ष गेलं अन्... वाचा पुढे काय घडलं?

Dombivli Viral Video News : मानवी वस्तीत साप कुठे आपलं घर करतील आणि कुठे नाही हे सांगणं कठीणच आहे. असाच एक साप चक्क स्कुटरच्या इंजिनमध्ये जाऊन बसल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पावसाळ्यात बिळात पाणी जमा झाल्याने बरेचसे साप हे मानवी वस्तीत फिरताना आढळतात. ते कोरड्या आणि सेफ जागेच्या शोधात आपल्या बिळातून बाहेर पडतात. आता मानवी वस्तीत साप कुठे आपलं घर करतील आणि कुठे नाही हे सांगणं कठीणच आहे. असाच एक साप चक्क स्कुटरच्या इंजिनमध्ये जाऊन बसल्याची माहिती समोर आली आहे.

साप स्कूटरच्या इंजिनमध्ये लपून बसला होता. स्कुटरवर होत असलेली हालचाल पाहून मालकाला लगेच इथे साप असल्याचा संशय आला. त्यावर स्कुटरच्या मालकाने पॉज संस्थेला फोन करून याबाबत माहिती दिली. पॉज संस्थेचे स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेत या सापाला स्कुटरमधून सुखरुप बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर त्या सापाला निसर्ग अधिवासात सोडून दिले आहे.

स्कुटरमध्ये लपलेला साप 1 फूट लांबीचा आहे. डुरक्या घोंणस जातीचा हा साप पूर्णपणे बिन विषारी असून तो खूप सुस्त असतो. ठाणे जिल्ह्यातील परिसरात या सापाचं वास्तव्य नेहमीच असतं. साप चपळ आणि विषारी नसल्याने त्याचा आपल्याला कोणताही धोका नसतो असे पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले आहे.

दरवर्षी पॉज संस्था शेकडो वन्यजीवांच्या मदतीला धावून जाते आणि गेल्या २४ वर्षांत संस्थेने हजारो वन्यजीव पुनर्वसित केले आहेत. संस्थेच्या 9820161114 या हेल्पलाईनवर कॉल आपण कॉल करू शकता.

सोशल मीडियावर पावसाळ्यात विविध ठिकाणी साप सापडल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या आधी देखील स्कूटर किंवा बाईकमध्ये साप लपल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासह व्यक्तींच्या श्यूजमध्ये देखील साप लपून बसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT