ncp, political news , navi mumbai  saam tv
मुंबई/पुणे

सेनेनंतर एनसीपीला लागली गळती; जिल्हाध्यक्षांसह सहा नगरसेवकांची मुख्यमंत्री शिंदेशी हातमिळवणी

आगामी काळात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे.

साम न्यूज नेटवर्क

NCP News : नवी मुंबईत (navi mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) खिंडार पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह सहा नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झालेली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंच्या नेतृत्वाखाली पक्षातील सहा नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात केवळ दाेनच नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात राहतील अशी शक्यता आहे.

दरम्यान उद्या सहा नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुऴे आगामी काळात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

SCROLL FOR NEXT