shrivardhan mumbai bus, raigad news saam tv
मुंबई/पुणे

MSRTC News : चालकाने दारु ढोसल्याने कंडक्टरने घेतला स्टेअरिंगचा ताबा, पुढचा 60 किलाेमीटरचा प्रवास झाला सुखकर

shrivardhan mumbai bus : या प्रकरणी चालकाविरुद रामवाडी (पेण) येथील एसटी महामंडळाच्या जिल्हा मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : चालकाने मद्यपान करुन बस चालविण्याचा प्रयत्न केल्याने वाहकाने (कंडक्टर) त्यास बाजूला करुन स्वत: स्टेअरिंग हातात घेत तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास पार पाडला. ही घटना रायगड येथून समाेर आली आहे. (Maharashtra News)

ही घटना शुक्रवारी संध्याकाळची आहे. श्रीवर्धन मुंबई एसटी बस संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन येथुन निघाली. बस माणगाव बस (msrtc bus) स्थानकात थांबली असता चालकाने तेथे मद्यपान केले.

चालकाने मद्यपान केल्याचे वाहकाच्या लक्षात आले. त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. कंडक्टर हा कम ड्रायव्हर असल्याने मद्यपी चालकाला बाजुला करीत त्याने बसचा ताबा घेतला. पुढे सुमारे 60 किलोमीटरचा प्रवास करीत कंडक्टरने बस स्थानकात आणली.

दरम्यान रामवाडी येथे चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. चालकास एसटी महामंडळाने बडतर्फ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT