shrirampur court issued bail to mla bacchu kadu Saam Tv
मुंबई/पुणे

Bacchu Kadu : शेतक-यांसाठी कितीही करा... जातीसाठी केलं तरच माणूस मोठा होतो : बच्चू कडू

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर दाखल आहे. त्याची सुनावणी आज श्रीरामपूर न्यायालयात झाली.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

मी कोर्टात येरझऱ्या मारत असलो तरी ज्यांच्यासाठी आंदोलन केले ते शेतकरी मला कुठेही दिसत नाहीत. शेतकऱ्यांसाठी केले तर फार नाव होत नाही. मात्र जातीसाठी केले तर माणूस मोठा होतो असा टाेला आज (साेमवार) आमदार बच्चू कडू (bachchu kadu latest marathi news) यांनी काेणाचेही नाव न घेता लगावला. दरम्यान सध्याच्या घडामाेडी पाहता आमदार कडू यांनी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) आणि मनाेज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांना तर अप्रत्यक्षरित्या हा टोला मारला की काय अशी चर्चा श्रीरामपूर येथे हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

सन 2017 कालावधीत पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळे फासल्याचा आराेप आमदार बच्चू कडू यांच्यावर आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर दाखल आहे.

या प्रकरणाची आज श्रीरामपूर न्यायालयात सुनावणी हाेती. त्यास आमदार कडू उपस्थित हाेते. न्यायालयाने कडू यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर आमदार कडू यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. मी कोर्टात येरझऱ्या मारत असलो तरी ज्यांच्यासाठी आंदोलन केले ते शेतकरी मला कुठेही दिसत नाहीत अशी खंत आमदार कडू यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांसाठी केले तर फार नाव होत नाही. मात्र जातीसाठी केले तर माणूस मोठा होतो अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT