Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? वाचा

Maharashtra Political News : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

विकास काटे, अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : महायुतीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाता तिढा होता. या जागांवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच होती. आज या जागांचा तिढा मिटला. ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, अधिकृतरित्या शिंदे गटाकडून याबाबत घोषणा झालेली नव्हती. शिंदे गटाने दोन्ही जागांवरील उमेदवार जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे रिंगणात असतील. तर शिंदे गटाकडून नरेश म्हक्के रिंगणात असतील. तर कल्याणमध्ये शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे उभे अतील. तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर रिंगणात आहेत.

उमेदवारी जाहीर झाल्यावर नरेश म्हस्के काय म्हणाले?

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणाले,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वाद आणि सर्व पदाधिकारी, मित्र पक्षाच्या आशीर्वादाने उमेदवारी जाहीर झाली. आमचा तळागाळातील कार्यकर्ता. भाजप, मनसे आणि रिपाईंच्या नेत्यांचे आशीर्वाद सोबत राहतील. एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली. समाजात काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. कार्यकर्त्याला ही संधी दिली आहे. संधीचे सोने करण्याची संधी दिली. विजयाकडे वाटचाल करेल. हिंदुत्वाची भूमिका पार पाडेल. बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहील'.

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप धन्यवाद. सर्व महायुतीच्या नेत्यांचे धन्यवाद. मला पुन्हा एकदा अधिकृतरित्या उमेदवारी दिली. या दोन्ही जागा महायुतीच्या मी किंवा नरेश म्हस्के असतील. नरेश म्हस्के यांची सुरुवात ठाणे महापालिकेतून सुरु झाली. त्यांना शिंदे यांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळाली. हा पूर्ण जिल्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील दोन जागा युतीचा उमेदवार निवडून येतो. या दोन्ही जागा बहुमताने निवडून येतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT