shri guru paduka darshan : Saam tv
मुंबई/पुणे

श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्सुकता शिगेला; स्वामी स्वरुपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

shri guru paduka darshan : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वामी स्वरुपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन होणार आहे.

Saam Tv

‘सकाळ माध्यम समूहा’ने २१ आणि २२ मार्च रोजी मुंबईच्या वरळीतील एनएससीआय डोम येथे श्री गुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात एकाच छताखाली २१ संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या भक्तीच्या महाकुंभाचं शनिवारी उद्‍घाटन होणार आहे.

महाराष्ट्राची भूमी संत-महात्म्यांच्या विचाराने समृद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक श्रद्धास्थानांच्या भक्ती सुगंधासाठी कायम व्याकूळ असतात. परंतु अनेकांना श्रद्धेच्या ठिकाणी जाऊन श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे शक्य नसते. त्यामुळे हा ‘भक्तीचा महाकुंभ’ आयोजित करण्यात आलाय. या महाकुंभाचे शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते आणि आध्यात्मिक, योगगुरू श्री एम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन होणार आहे. या महोत्सवादरम्यान रविवारी सकाळी १० वाजता श्री एम यांचे व्याख्यान होईल.

या उत्सवाला राज्यभरातून आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गुरुसेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे निश्‍चित केलंय. तसेच भाविकही या सोहळ्यासाठी आतुर झालेत. या उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्री पादुकांचे दर्शन व्हावे, म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू झालीये. त्यासाठी भाविकांना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

श्री एम यांचे मार्गदर्शन

श्री एम हे सत्संग फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू आहेत. शिक्षणतज्ज्ञ, लेखक, समाजसुधारक आणि जागतिक कीर्तीचे वक्ते असलेले श्री एम विविध आध्यात्मिक विषयांवर जगभरात व्याख्याने देतात. ते उपस्थितांशी संवाद साधतात. तसेच त्यांच्या विविध शंकांचे निराकरण करतात. त्यांचे विचार ऐकण्याची संधी रविवारी या उत्सवानिमित्त ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिलीये.

स्वामी स्वरूपानंदांचे कार्य

धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात चिन्मय मिशन कार्यरत असून त्यांनी साधक म्हणून स्वामी स्वरूपानंद यांचा प्रवास सुरू झालाय. ते मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख आहेत.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे वरळी येथील ‘एनएससीआय डोम’ येथे दोनदिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ आयोजित करण्यात आलाय. या महाकुंभात भाविकांना संत, सद्‍गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.

दिनांक: 21 (शनिवार) आणि 22 (रविवार) मार्च 2026

वेळ: सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत

स्थळ : NSCI DOME, वरळी, मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT