Titwala Crime News  AI Image
मुंबई/पुणे

Shocking : जमिनीचा वाद टोकाला गेला; मुलानं घरात घुसून वडील-भावावर झाडल्या गोळ्या, टिटवाळा हादरले

Titwala Crime News : टिटवाळ्याजवळील गुरवलीपाड्यात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून कल्पेश शेलारने वडील बाळाराम आणि भाऊ भरत यांच्यावर गोळीबार केला. दोघे गंभीर जखमी असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • टिटवाळ्याजवळील गुरवलीपाडा परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना

  • कल्पेश शेलार याच्यावर वडील आणि भावावर गोळीबार केल्याचा आरोप

  • वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा मिळावा यावरून वाद झाल्याची माहिती

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

मालमत्तेतील वाटा मिळावा, यासाठी सुरू असलेल्या वादातून एका मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्याजवळील गुरवलीपाडा परिसरात घडली. या हल्ल्यात वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या घटनेतील आरोपीचे नाव कल्पेश शेलार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश हा गेल्या दीड वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून वेगळा राहत होता. मात्र, वडिलोपार्जित मालमत्तेत आपल्याला हिस्सा मिळावा, अशी त्याची मागणी होती. याच कारणावरून त्याचे कुटुंबासोबत वारंवार वाद होत होते. मालमत्तेतील वाटा देण्यासाठी तो वडिलांकडे सतत तगादा लावत होता.

याच वादातून कल्पेश संतप्त झाला. त्यानंतर तो थेट वडिलांच्या घरी पोहोचला. घरात गेल्यानंतर त्याने कोणताही विचार न करता वडील बाळाराम आणि भाऊ भरत यांच्यावर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्या लागल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी कल्पेश घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, या घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे गुरवलीपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात वसुलीला आलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर टाकली नीळ

Diwali Fatigue: दिवाळीच्या धावपळीमुळे जाणवतोय थकवा आणि आळस? मग घरीच करा हे ७ सोपे उपाय!

माजी खासदार आणि सीबीआय अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

Political News: भाजप आमदाराच्या वडिलांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT