Mumbai crime news today 
मुंबई/पुणे

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Mumbai crime, woman assault : मुंबईतील दहिसर भागात एका तरुणीला भर रस्त्यात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai crime news today : दहिसर (पश्चिम) येथील नवागाव परिसरातील शास्त्रीनगर शिवमंदिरासमोर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका तरुणीला भररस्त्यात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Mumbai Dahisar woman assault CCTV video news)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने रस्त्यावरच तरुणीला गाठून तिला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. तरुणीला मारहाण होत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी नागरिकांनाही शिवीगाळ केली.

घटनेची गंभीर दखल घेत एमएचबी कॉलनी पोलिसांनी स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेत तत्काळ कारवाई केली आणि मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून, या कृत्यामागचे नेमके कारण काय होते याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, मारहाण झालेली तरुणी अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई अधिक स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT